पार्श्वभूमी
माहिती-तंत्रज्ञानाच्या
युगात पारंपारिक ज्ञान साधनेच्या पद्धती व प्रयत्न अपुरे पडत आहेत, हा आपणा सर्वांचा
अनुभव आहे. विविध क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करण्यावर भर देणे
क्रमप्राप्त बनले आहे. यासाठी आवश्यक क्षमतांचा विकास होणे गरजेचे असते. खेड्यापाड्यातील
शाळांमध्ये उत्तम प्रतीचे बुद्धिमत्ता लाभलेले विद्यार्थी आढळतात; पण योग्य
मार्गदर्शनाअभावी त्या स्पर्धेत मागे पडतात. कर्मवीर अण्णा हुशार
विद्यार्थ्यांचा शोध घेऊन साताऱ्याला नेत आणि त्यांच्या शिक्षणाची
पूर्ण जबाबदारी घेत. त्यांनी असे विद्यार्थी ग्रामीण भागातून शोधून आणून त्यांना
शिक्षणासाठी परदेशी देखील पाठवून इतिहास घडविला. आजच्या
बदललेल्या परिस्थितीत आव्हानांच्या काळात कर्मवीर
अण्णांनी मार्ग अनुसरत कर्मवीर
विद्याप्रबोधिनी, रयत शिक्षण संस्थेने
रयत प्रज्ञाशोध हा प्रकल्प 1998 साली
सुरू केला.
प्रमुख उद्दिष्टे
संस्थेच्या विविध
शाखांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे.
निवडलेल्या विद्यार्थ्यांचे शालेय महाविद्यालयीन व अन्य स्पर्धा
परीक्षेसाठी तयारी करून घेणे.
निवडलेल्या
विद्यार्थ्यांच्या अंगीभूत बुद्धी बरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध
पैलूंचा विकास करण्यासाठी सहाय्य करणे.
निवडलेल्या
विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देऊन गौरव करणे व त्यांना उत्तेजन देणे.
शिष्यवृत्तीधारक
विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीचे मूल्यमापन करून त्यांना मार्गदर्शन करणे..
पात्रता
रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पात्र समजले जाते.
परीक्षेचे स्वरूप:-
अ) लेखी परीक्षा:-
गुण:-
200
प्रश्नसंख्या:-100
वेळ:-
2 तास
आ) मुलाखत:- 20 गुण
लेखी परीक्षा:-
लेखी परीक्षा 100 प्रश्नांची होणार आहे.
प्रत्येक प्रश्नाला
दोन गुण आहेत.
सदरची लेखी परीक्षा
200 गुणांची राहील.
परीक्षेसाठी दोन
तास वेळ राहणार आहे.
सर्व प्रश्न MCQ
(Multiple Choice Questions) म्हणजे
बहुपर्यायी आहेत.
योग्य पर्यायाचे
वर्तुळ रंगवायचे आहे.
परीक्षेचे माध्यम:- मराठी
सेमी इंग्रजी व इंग्रजी
विषयवार भारांश:-
अ.क्र.
|
विषय
|
प्रश्नसंख्या
|
गुण
|
1
|
मराठी
|
10
|
20
|
2
|
इंग्रजी
|
10
|
20
|
3
|
विज्ञान
|
15
|
30
|
4
|
गणित
|
15
|
30
|
5
|
इतिहास
|
06
|
12
|
6
|
भूगोल
|
06
|
12
|
7
|
ना. शास्त्र
|
03
|
06
|
8
|
बुद्धिमापन कसोटी
|
20
|
40
|
9
|
सामान्यज्ञान व चालू घडामोडी
|
15
|
30
|
एकूण
|
100
|
200
|
मुलाखत:-
विद्यार्थ्यांना
मुलाखत तंत्राचा परिचय व्हावा व त्याचा सराव व्हावा.
मुलाखती संबंधी
त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी.
भविष्यातील विविध
स्पर्धा परीक्षांसाठी अथवा विविध क्षेत्रात द्याव्या लागणाऱ्या मुलाखतीची
पूर्वतयारी व्हावी.
मुलाखत तंत्राचा
भाग रयत प्रज्ञाशोध परीक्षा अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे.
विद्यार्थ्यांना
एखाद्या विषयाबद्दल किती ज्ञान आहे?
त्याला त्या
विषयाचे कितपत आकलन झालेले आहे?
एखाद्या बाबीसंबंधी
तो कसा विचार करतो?.
आपले विचार तो पुढे
कसे म्हणतो? या बाबींची पडताळणी
मुलाखतीद्वारे करण्यात येते.
तसेच मुलाखती वेळी
त्यांचे एकूण वर्तन, व्यक्तिमत्व विकासाचे इतर घटक यांचे निरीक्षण केले जाते.
मुलाखतीस जाताना
विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती फाइल व
छंदाविषयी केलेला संग्रह इत्यादी साहित्य बरोबर आणावे लागते.
छंदाविषयी केलेला संग्रह इत्यादी साहित्य बरोबर आणावे लागते.
मुलाखतीसाठी खालील घटक निश्चित
करण्यात आलेले आहेत:- 20 गुण
1.रयत शिक्षण संस्था,
कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील
यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना प्रसंग आणि साल गुण 5
यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना प्रसंग आणि साल गुण 5
2. English Communication Skill:- Information on School,
Family,
Teacher, Friend, Environment गुण 5
Teacher, Friend, Environment गुण 5
3. सहशालेय किंवा सामाजिक उपक्रमातील सहभाग / छंद, विज्ञान प्रदर्शन,
विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम ,
क्षेत्रभेट, सामाजिक उपक्रमातील सहभाग, जोपासलेला छंद गुण 5
विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम ,
क्षेत्रभेट, सामाजिक उपक्रमातील सहभाग, जोपासलेला छंद गुण 5
4. सामान्य ज्ञान:- महाराष्ट्र, नद्या- उपनद्या, धरणे, पर्वत, शिखरे, पर्जन्य,
जिल्हे पंचायत राज व्यवस्था क्रीडा विषयक माहिती
व संगणक इत्यादी गुण 5
जिल्हे पंचायत राज व्यवस्था क्रीडा विषयक माहिती
व संगणक इत्यादी गुण 5
इयत्ता सातवी- रयत प्रज्ञाशोध अभ्यासमाला (RTS आज अखेर सर्व लिंक )
विषय : मराठी
विषय : English
विषय : सा.ज्ञान
विषय : गणित
विषय : सा.विज्ञान
विषय : सा.शास्त्रे
विषय : बुध्दिमत्ता
संपर्क
संबंधित विभागीय कार्यालये, रयत शिक्षण संस्था
No comments:
Post a Comment