रयत शिक्षण संस्था

रयत शिक्षण संस्था
      छत्रपती शाहु महाराजांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार केला. शिक्षणाच्या प्रसाराने मने संस्कारित झाली म्हणजे जातिभेद नष्ट होईल या भावनेने त्यांनी सार्वजनिक शिक्षणाची मोहीम कोल्हापूर संस्थानात सुरू केली. अस्पृश्य समाजातील शिकलेल्या मुलांना त्यांनी नोकऱ्या दिल्या इतकेच नव्हे तर दुर्बल घटकांसाठी राखीव जागाही ठेवल्या.शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांनी आर्थिक पाठबळ दिले. शिक्षणाचा प्रसार ग्रामीण भागात करीत असतांना शिक्षणासाठी दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी वेगवेगळ्या जाती-धर्मांसाठी अनेक वसतिगृहांची स्थापना केली. कोल्हापुरातच नव्हे तर नाशिक, नगर, पुणे आदि मोठ्या शहरात त्यांनी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आणि राहण्यासाठी वसतिगृहे सुरू केली.
      छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक व्यक्तींची पुढे शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला वाहून घेतले. कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांपैकी एक होत.
      बहुजन समाजाला शिक्षण देऊन त्यांची सर्वांगीण प्रगती साध्य करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्था स्थापन केली. कराड जवळ काले या गावी एक वसतिगृह स्थापन होऊन या संस्थेच्या कार्यास प्रारंभ झाला. १९२४ मध्ये रयत संस्थेने सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू बोर्डिंग हे दुसरे वसतिगृह स्थापन करण्यात केले. गांधींनी १९२७ मध्ये या वसतिगृहास भेट दिली. १९४२ मध्ये सातारा येथे विद्यार्थिनींसाठी वसतिगृह स्थापन करण्यात आले. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातीएल एक मान्यवर संस्था असून या संस्थेने राज्यात ५७८ प्राथमिक शाळा सुरू केल्या आणि नंतर प्राथमिक शिक्षण सक्तीने झाल्यानंतर त्या जिल्हा स्कूल बोर्डाच्या स्वाधीन केल्या. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात संस्थेने आतपर्यंत ४३८ माध्यमिक शाळा८ अध्यापक विद्यालये२८ प्राथमिक शाळा१७ पूर्व प्राथमिक शाळा६८ वसतीगृहे४१ महाविद्यालये८ आश्रम शाळा२ औद्योगिक प्रशिक्षण संस्था७ प्रशासकिय कार्यालयेव इतर ५७ शाखा अशा ६७४ शाखा कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील १४ आणि कर्नाटकातील १ अशा एकूण १५ जिल्ह्यात संस्थेचे शैक्षणिक कार्य चालू आहे. सन १९७४-७५ मध्ये कर्मवीर विद्या प्रबोधिनी स्थापन करण्यात आली व त्या द्वारे स्पर्धा परीक्षात ग्रामीण भागातील मुलांची बौद्धिक वाढ आणि विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले.
      कर्मवीरांचा शिक्षण प्रसाराचा विचार शिरोधार्य मानून या शैक्षणिक प्रसाराबरोबरच आधुनिक काळाला उपयुक्त असणारे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. विशेषत: संगणक शिक्षणइंग्रजी सभाषण वर्गसेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सोयगुरूकुल प्रकल्पस्पर्धा परीक्षा मार्गदर्शनडिजीटल स्कूलरयत प्रज्ञाशोध प्रकल्पया सारख्या के.जी टू पी.जी. पर्यंत आधुनिक शिक्षण संस्थेमार्फत देण्याचा अखंड प्रयत्न सुरु आहे.




No comments:

Post a Comment